Share

Share

Wednesday, June 6, 2012

"अशी ती"



प्रेमाला प्रेम समजणारी "अशी ती" असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी
चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी "अशी ती" असावी

ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी "अशी ती" असावी
यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र "अशी ती" असावी
हाय… हेलो… नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी "अशी ती" असावी

थोडी खट्टी…थोडी मिठी "अशी ती" असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी
हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी

इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी
चोरून चोरून भेटायला येणारी "अशी ती" असावी
हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी

आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी
प्रेमाला प्रेम समजणारी "अशी ती" असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी "अशी ती" असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी

0 comments:

Post a Comment