Share

Share

Friday, June 22, 2012

तू परत येऊ नकोस ..............

तू परत येऊ नकोस ,
जुन्या आठवणी जागवायाला ,
आधीच खुप दीवस लागलेत ,
मनावरी जखमा भरायला ...

दुःख अंतरी दाबुन ,
... एकांतामध्ये रडत असतो ,
म्हणुन का कोणास ठाउक,
सर्वांसोबत हसत असतो ...

तू आयुष्यात परत येऊ नकोस,
तूजे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय ,
तुझ्या आठवणी विसरायला...

पण ,
काहीही असले तरी ...
तुला शोधयाला तरी ,
नजर माझी फीरत असते ,
आकाशात चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटून येते ...

तुला विसर्नायाचा ,
अत्ता कुठे मी प्रयत्न करतोय ,
पण ही कवीता लिहता लिहता ,
पुन्हा तुलाच ग़ मी आठवतोय .

0 comments:

Post a Comment