Share

Share

Monday, June 11, 2012

प्रेयसी माझी.........

तिला म्हणालो,मला आज काल झोप येत नाही
काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स
उघडली झोपेची गोळी काढून माझ्या हातावरती दिली. ......
काय सांगू तुम्हाला, माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एसआहे.

मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली, धीरधर अजुन थोडासाच उशीर
आहे.
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्त तपासणी शिबीर आहे.......
काय सांगू तुम्हाला, माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्या क्षणी ती उठली, आणिआत निघून गेली.
माघारी येताना हाती "डिसेक्शनबोक्स" घेवून
आली......
मित्रांनो अशीही, माझी वेगळीच केस आहे. अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.
तिने तिची ओढणी, माझ्या पायावरती बांधली.
नजरेस नजर मिळवून माझ्या, हळूचती म्हणाली.
पडलास तू, पण जखम माझ्या काळजावरती झाली..

0 comments:

Post a Comment