Share

Share

Saturday, June 23, 2012

ते प्रेम असते...!!!

प्रेम काय असत्?

प्रेम प्रेम काय असतं
जे मुद्दामहून केल्याने होत नसतं,
ते आपसूक होत असतं..

... ती व्यक्ती माहीतही नसते
तिच्याबद्दल मनात विचारही नसतो
पण हळूहळू आपुलकी वाटते,
जिव्हाळा वाढतो.
ते प्रेम असते...!!!

प्रेम हे हळुवार उडणाऱ्या फुलपाखरासारखे असते,
हळूच ती व्यक्ती आपल्या मनात घर करून बसते.
मग रात्र असो का दिवस एकसारखेच वाटतात,
ते प्रेम असते...!!!

क्षणाक्षणाला तीचे विचार मनात येऊन जातात.
असा एकही दिवस नाही कि तिची आठवण येत नाही ,
ते प्रेम असते...!!!

तिचा चेहरा पाहिल्याशिवाय कधी झोप येत नाही.
आयुष्य अचानक रंगानी न्हाऊन निघतं,
आणि स्वप्नामध्ये एकच चित्र तयार होत असतं...
ते प्रेम असते...!!!

तिचे सुख ते माझे सुख,
तिचे दुःख ते माझे दुःख,
तिचा जीव तो माझा जीव,
आणि तिच्यासाठी माझा जीव...
असं काहीतरी होऊन बसतं...
ते प्रेम असते...!!!

0 comments:

Post a Comment