Share

Share

Tuesday, October 30, 2012

आई!

माझ्या सगळ्या मित्र मैत्रिंणीँना जे घरापासुन लांब राहतात शिक्षणासाठी नोकरीसाठी

आई!

आभ्यास करुन करुन वीट येतो, आँफिसमधुन थकून येतो
जर तू असतीस तर न सांगताच चहाचा
कप पुढे केला असतास......

MESS च्या जेवणाची चव लागत नाही
तुझ्या फोडणीच्या भाताला पण अमृताची चव असते.....

सणासुदीला तु लावलेला दिवा आठवतो
तुझ्या स्पर्शाने नुसत्या मंगलमय घर होत
इथे सून्या सून्या घराला घरपण द्यायला.....

मोठा झालोय तरी पण एकट झोपायची भिती वाटते
सगळे Friends आहेत
पण तुझ्यासारखी माया काळजी कुणी नाही करु शकत
तुझ्या कुशीत पुन्हा लहान होउन
शिरावस वाटतय.....

सुट्टी लागली की घरी जायच म्हणुन गगना एवढा आनंद होतो
पण निरोप घेताना तेवढच दुःख हळुच मिठी मारायची
पटकन पाया पडायच आणि सटकायच
तर का तुझे अर्शु दिसायला नकोत म्हणून.....

तुझ्या ईवलाश्या डोळ्यांतल्या स्वप्नांची कदर आहे म्हणून
हे सगळ सहन करु शकतो।
तुझी स्वप्न आहेत म्हणुन मी आहे..........आई!

0 comments:

Post a Comment