Love Is Life

Love Is Life

Love Is Lifee

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Share

Share

Wednesday, June 6, 2012

कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू ................
कोसळत्या धारा
थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओलीरात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

मन......

वाटते मनाला माझ्या पंख द्विजाचे असावे
असशील तू जेथेही भेटण्यास उडत यावे ।
वाटते मनाला माझ्या कोमल स्वर शब्द व्हावे
तुझ्या हंसर्या ओठांवरती नाचत फुलत उमटावे ।
वाटते मनाला माझ्या मधुर सुगंधी फुल व्हावे
हारामध्ये गुंफुनि तुझ्या सतत कंठी राहावे ।
वाटत मनाला माझ्या रक्ताचा थेंब व्हावे
प्रेमळ हृदयांत तुझ्या कायमचे वास्तव्य करावे ।
वाटते मनाला माझ्या मंद सुगंधी वारा व्हावे
अन तुझ्या अंग-अंगाला हळुवारपणे गोंजारत रहावे ।
वाटते मनाला माझ्या आभाळीचा मेघ व्हावे
प्रीत धारांनी तुला पूर्णपणे भिजवून टाकावे ।
वाटते मनाला माझ्या तुझ्या नेत्रींचे अश्रुं व्हावे
सुखाने व दुखाःने सुटता तुझ्याच ऊरी विराजावे ।।

बघ नक्कीच...

भरल्या चुड्यासह उंबरा ओलांडशील..
स्वप्ने तुझी-माझी नकळत जुळतील.
अन माझ्या नशीबाच्या रेषा सये...
नकळतच तुझ्या हातांवर दिसतील...
बघ नक्कीच...

सये...त्यावेळच्या तुझ्या प्रत्येक
पावलांसोबत आपल्यातला एक एक बंध..
नकळतच घट्ट होत जाईल...
कदाचित...जन्मोजन्मासाठी..
बघ नक्कीच...

त्या तुझ्या केसातल्या मोग-याचा सुगंध..
त्याक्षणी सारं काही विसरुन टाकायला लावेल..
सगळं काही...सारी दुःख...तु नसताना सोबत...
पाहीलेली...अनुभवलेली...
ते काट्यासमान बोचरे क्षण...तुझ्याशिवायचे...
सारं काही मी विसरेन..
बघ नक्कीच....

एक चिमनि...

एक चिमनि चिमन्या च्या प्रेमात पडली...
तिने त्याला प्रपोस पण केल...
पण मात्र चिमना चिमनीला म्हणाला मला जास्त उंच उडता येत नाही पण तु तर मात्र उंच उडु शकतेस मग... मग चिमनीने त्याच्यासाठी स्वतःचे पंख कापुन टाकले... नंतर त्यांनी दोघांनी छानस-छोटस अस घरट तयार केल आणि त्यात ते दोघे सुखात संसार करायला लागले... पण मात्र एके दिवशी खूप मोठे वादळ आले, त्या वादळात चिमना हळु-हळु करून उडुन गेला पण मात्र चिमनीला पंख नसल्यामुळे ती उडु शकली नाही... नंतर वादळ शांत झाल्यावर चिमना आला आणि त्याने बघितले कि चिमनि मरून पडलेली होती आणि तिने फांदीवर लिहिले होते कि "एकदा बोलला असतास कि मी परत येणार आहे तर मी वादलाशीही लढले असते..."

आयुष्याच्या ह्या वळणावर,

आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं....
कोण असेल ती, कशी असेल ती,
... शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात....
मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी असते समोर,
भिडते नजर थेट,
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो,
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो ....
काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम .....
पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत.....
म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . .
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू
भी कभी अकेला मरता हे"