Love Is Life

Love Is Life

Love Is Lifee

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Share

Share

Wednesday, June 6, 2012

काय लिहावे आज, 'कारण'

काय लिहावे आज, 'कारण'
काही सुचेना मला
उसंत आहे, शब्द आहेत, 'आठवण' कोणाचीच
आज येईना मला..
खोडकर आहे वातावरण, पण
चिमटा काही बसेना मला
ध्यान लावून बसलोय खरं, पण वेध
काही लागेना मला..
मोगरा फुलला, चाफा बहरला, सुगंध
काही येईना मला
खूप काही सांगायचय, खूप
काही बोलायचय,
पण माझं म्हणावं असं, ऐकणारं
कोणी नाहीये मला..
पाउसही आतुर झालाय, चिंब चिंब
करण्यास मला
पक्ष्यांची किलबिल प्रवृत्त करतीये, सूर
काही नवे गाण्यास मला..
कठोर झालंय मन, कोमेजून गेलंय तन,
तरी भावना काही आवरेना मला
शांत झालोय, स्तब्ध झालोय, माझा मीच
काही केल्या सापडेना मला..
काय लिहावे आज, 'कारण'
काही सुचेना मला
उसंत आहे, शब्द आहेत, 'आठवण' कोणाचीच
आज येईना मला..

माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात..



कुणीतरी मला विचारले,
ती कुठे आहे..?????

मी हसत उत्तर दिले:
माझ्या श्वासात,
माझ्या हृदयात,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक
ठोक्यात..
यावर
पुन्हा विचारले गेले मग,
ती कुठे
नाही..?????

मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले:
माझ्या नशिबात
आणि माझ्या आयुष्यात..

कुणीतरी अचानक आयुष्यात येतं

कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
ह्रदयच्या कोप-यात त्याच नाव कोरल
जातं
प्रत्येक क्षणी मन त्यालाच शोधत
राहतं...

त्याचा वाटेवर मन रोखु पहातं सावली बनुन त्याच्या सोबत रहावस
वाटतं
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं...

कळी प्रमाणे मन दपु पहातं
नजरेत मात्र गुलाबचे फुल उमलुन जातं...

कुणीतरी अचानक आयुष्यात येतं आणि आयुष्यच बनुन जातं...

खरचं का ?
कोणी अचानक आयुष्यात येतं...? ♥

"अशी ती"



प्रेमाला प्रेम समजणारी "अशी ती" असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी
चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी "अशी ती" असावी

ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी "अशी ती" असावी
यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र "अशी ती" असावी
हाय… हेलो… नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी "अशी ती" असावी

थोडी खट्टी…थोडी मिठी "अशी ती" असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी
हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी

इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी
चोरून चोरून भेटायला येणारी "अशी ती" असावी
हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी

आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी
प्रेमाला प्रेम समजणारी "अशी ती" असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी "अशी ती" असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी

प्रश्नही फक्त तुझेच अन उत्तरेही...

तो न...ती...

तो : तुला ना काही कळतच नाही..
मी न बोलता काही समजत नाही...
शब्दांशी खेळणं अगदी सहजच जमतं
ओठांआडचे गुपीत कधी उलगडतचं नाही

ती=मनातली गुपितं तुझ्या
मीच नेहमी उलगडायचे का रे?
समजुन घे ना तुही
माझ्या शब्दांचे मौन सारे

तोः तु समजुन घ्यावेस
हीच एक इच्छा मनात असते...
कारण मनातल्या वादळाची
खंत बाकी कोणालाच नसते...

ती=चाहुल त्या वादळाची
मलाही छळते रे
वाट आहे जरी वळणांची
मी आहेच तुझ्या साथ रे

तोः सोबतीस तु नसतेस जरी..
याद तुझी अनावर असते...
हरएक क्षणांत उलगडणा-या
पुन्हा मनांत तुझीच प्रतिमा दिसते

ती= नको आठवांचे गाणे
उठी वेदनांचे काहुर रे
नसशिल ज्या क्षणी तु
होई जगणे माझे व्यर्थ रे

तोः आठवांचे गाणे सदैव गुणगुणत
मीच माझ्यात गुरफटत असतो..
अन माझ्या त्या अनाकलनीय वावरावर
पुन्हा मीच माझ्यावरच हसत असतो..

ती= भास का आभास होता
सांग रे तु कोण होता
संपले रे श्वास माझे
का तु अजुन जिवंत होता

ती= एकरुप होणे आपले
का श्वासांनाही मान्य नव्हते
जगणे नामंजुर त्यांना जरी
का मरणेही माझ्या नशीबी नव्हते

तो:श्वासांश्वासांत अखंड जाणीव
तुझीच मग छळते,
गुंतलेल्या त्या वादळात
तुझीच उणीव भासते..........खरंच!!!!!!!!!!!!!!

ती = गाठ जणू ती सैलच होती..
त्यातले अंतर आता खुंटत आहे..
दुरावा हा तुझा अभेदच होता..
त्यातच मी आता संपत आहे ...

तो:तुझ्यापासून दूर जायचं म्हटलं
तरी श्वास गुरफटतो..........
त्यामुळे बंद झालेला तुझा श्वास
माझाही जीव जाळत नेतो..........
मी मग जिवंतपणी मरत रहातो...........

ती = साथ तुझी मॄगजळासम...
मग सूर जणू बोलले ते मर्मबंध..
कंपतो एकांत जणू...माझाच ....
दिसतोस तिथे तू फक्त धूसर..

तो:समजून घेतल्यावर
वादळ कशाला गुंतून बसतील,
मग तीच उल्झन वळणच
वाढवत जातील..........बघ आजमावून

ती = कधी जाणलेस मन माझे...
अशी कित्येक वादळं गुतलीत तेथेच...
कारणं अनेक अशी कीती सांगावीत...
प्रश्नही फक्त तुझेच अन उत्तरेही...