Love Is Life

Love Is Life

Love Is Lifee

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Share

Share

Saturday, June 23, 2012

माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जाने मला पसंद आहे......................

माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जाने मला पसंद
आहे...
तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच आनंद आहे...

तुला हसवण्यापेक्षा तुला रडवणे मला पसंद आहे...
मिट्टीत घेवून तुला समजावण्यात एक
... वेगळाच आनंद आहे...

तुझ्या होकाराला नकार देणे मला पसंद आहे...
तुला रागवलेली पाहण्यात एक वेगळाच
आनंद आहे...

माझ्यापेक्षा तुला सुखी ठेवणे मला पसंद आहे...
तुझ्या सुखात आपले सुख समजण्यात एक
वेगळाच आनंद आहे...

तुझ्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहणे
मला पसंद आहे...
वाहणारे अश्रू थांबवण्यात एक वेगळाच
आनंद आहे....

फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस..........

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,

विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,

हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस !!!
 

ती & तो............

ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस ना ?

तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ सोडते का, मी तर तुझी सावली आहे..

ती : पण मग अंधारात ? अंधारात जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण मला विसरशील ? मला अंधाराचीखुप भीती वाटते रे.

... तो : भिवु नकोस. मी आहे ना. अंधार पडला तर
मी लगेच तुलामाझ्या मिठीत घेईन ना..

ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल

तुच माझी आहेस...............

तुच माझी आहेस
तुच...
माझ्या आयुष्याची सुरुवातही तुच
आणि माझा शेवटही तुच
जो बोलेल प्रेमाचा शब्दनशब्द
तो आवजही तुच
... जिच्यावर केल होत
कधी मनापासुन प्रेम मी
आजही माझ्या स्वप्नातली
ती परीही तुच
जिंकलीही तुच आणि
हरलीही तुच
तो खेळ माझ्या आयुष्याचा
केलासही तुच
माझ्या स्वप्नही तुच
आणि ध्येयहि तुच
तु माझी आहेस ?
कि तु माझी नाहि ?
असं का वाटतय.
का मनाला पडलेला हा प्रश्नही तुच...

प्रेम..........

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे
"आकर्षण" असतं...♥
परत पहावसं वाटणं हा "मोह"असतो...♥
त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही "ओढ"असते...♥
त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा "अनुभव" असतो...♥
आणि त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं हेच खरं "प्रेम" असतं...♥

I LOVE YOU TOOO "............

पियु - काय रे चूप का आहेस आज?

समिर - नाही ग कुठे काय

पियु - मग कसला विचार करतोस एवढा?

... समिर - काही नाही ग कसलाच नाही

पियु - मी ऐकलंय छान छान कविता करतोस, मग आता पण काही मनात चालाय का ?

समिर - तसं काही नाही ग आता काही नाही आहे मनात आणि तुला कोणी सांगितलं
मी कविता करतो ते?

पियु - तुझेच सर्वे मित्र बोलत असतात खूप छान कवीता करतोस ते आणि मला संग माझ्यावर कधी कवीता केली आहेस का ?

समिर - एकदम गप्प आणि मनातच
बोलतो माझ्या कवीता तुझ्या पासूनच सुरु
होतात आणि तुझा पासूनच संपतात

पियु - काय रे गप्प का झालास परत बोलत नाहीस,चल आज तू माझ्यावर एक कवीता कर ..मला सुधा ऐकायची आहे कशी कवीता करतोस ते?

समिर - मनातच बोलतो आज चांगली वेळ आहे सर्व सांगतो कवितेतून जे होईल ते होईल बघू पुढे

पियु - करतोस ना कवीता आता आजून किती वाट बघायची आहे आणि तिच्या मनात सुधा हेच चाललं असता निदान कवितेतून तरी सर्व सांगेल जे माझ्या मनात आहे, बघू काय बोलतो ते

समिर - मैत्री पासून आपलं नातं सुरु झालं
अनोळखी आपण एक मेकांशी बोलू लागलो
मैत्रीच नातं कधी घट्ट झालं हे कळलच नाही
मैत्री अशी होती कि सर्व गोष्ठी एकमेकांशी वाटू लागलो मैत्री तुझी मला खूप आवडते
पण मन माझं कधी तुझ्या प्रेमात रंगायला लागलं कळलंच नाही.. जेव्हा पासून आयुष्यात आलीस त्या दिवसा पासून माझं आयुष बदलूनच गेलं..आता तुझी सवय झाली आहे मला जेव्हा तुला भेटतो तेव्हा खूप छान वाटतं..तुझ्याशी दूर जावंसं वाटतच नाही
आणि तुला एक दिवस नाही भेटलो तर मनात सारखं तुझाच विचार चालू असतो...तू समोर असलीस कि तुलाच बघावसं वाटतं...तू लांब असलीस कि नझर तुलाच शोधत असते माझं दिवस तुझ्या पासून सुरु होतो...आणि रात्र तुझ्या आठवणीत संपते....आता तर माझं आयुष्य तुझ्या विना अधुरच आहे
मनापसून प्रेम करतो तुझ्यावर पूर्ण आयुष्य जगायचा आहे तुझ्याच बरोबर
तुला खूप खुश ठेवायचं आहे आणि तुझं आयुष्य आनंदाने फुलवायचं आहे..
पण तुझं मनात देखील तेच आहे जे माझ्या मनात आहे..हे मला माहित नाही

पियु - ऐकूनच डोळ्यात पाणी येतं आणि त्याचा मिठीत जाऊन रडू लागते आणि त्याला सांगते किती दिवस हे ऐकायची वाट बघत होते, एवढं वेळ लावलास बोलायला, माझ्यावर प्रेम करतोस मग माझं मन नाही ओळखलस का तू

समिर - खरा सांगू मला देखील वाटत होतं तुझं
माझ्यावर प्रेम असेल पण घाबरत होतो जर तसं नसेल तर एक चांगली मैत्रीण देखील गमविन मी पण आज ठरवलं जे होईल ते होईल तुला सांगणारच माझं प्रेम आहे तुझ्यावर, " I LOVE YOU "

पियु - आनंदाचे अश्रू थांबतच न्हवते
आणि त्याला आपल्या घट्ट मिठीत घेऊन
बोलते " I LOVE YOU TOOO ".

अस कुणीतरी जिवनात याव्.............

अस कुणीतरी जिवनात याव्
" तु माझा ,तु माझा ,"
म्हणत् प्रेमाने जवळ घ्याव्,
फक्त तिच्या स्पर्शाने
अंगावर रोमांच याव्,
अस कुणीतरी जिवनात याव्
...
सुखाच्या क्षणात्
मनापासुन हसवाव्,
दु:खात माझ्या
सहभागी व्हाव्,
अस कुणीतरी जिवनात याव्

ऊनात चालताना
साथ दयावी,
पावसात त्याची
सोबत असावी,
थंडीत त्याची साथ असावी,
अस कुणीतरी जिवनात याव्

फक्त त्याचा चेहरा पाहील्यावर्
ओठावार हास्य याव्,
कधीतरी रुसल्यावार्
अलगद मिठीत घ्याव्,
अस कुणीतरी जिवनात याव्

प्रत्येक दिवसाची पहाट
ज्याच्या सोबतीने व्हावी,
फक्त अर्ध्यावर साथ न सोडता
आयुष्य भराची साथ दयावी,

मलाही वाटतं कधि कधि, आपणही प्रेम करावं..................

मलाही वाटतं कधि कधि,
आपणही प्रेम करावं…….

कोणाच्या तरी गोड हसण्यावर,
मी सुद्धा वेडं व्हावं…

... नदी काठी एका सुंदर संध्याकाळी,
आम्ही दोघेच असावं….

पहिल्या पावसात मातीचा गंध घेत,
आम्ही दोघांनीच फिरावं…….

माझं तुझ्यावर प्रेम आहे
असं एकमेकाला सारखच का सांगाव?

दोघांच्याही मनात हे सत्य,
खोलवर कोरलेलं असावं,

प्रेम हे कधीही बंधन वाटू नये,
कितीही वर्षं लोटली तरी त्यातली मजाच संपू नये…

तिनेच प्रत्येक वेळी का म्हणून स्वतःला बदलाव?
तिच्यासाठी कधि कधि मी ही आपलं म्हणणं सोडावं….

पण काय करु ?
माझं मन जाणणारी मला कोणी भेटतच नाही...!

की तुम्हीच सांगा,
प्रेम म्हणजे नक्की काय
हे मला कळतचं नाही?

ते प्रेम असते...!!!

प्रेम काय असत्?

प्रेम प्रेम काय असतं
जे मुद्दामहून केल्याने होत नसतं,
ते आपसूक होत असतं..

... ती व्यक्ती माहीतही नसते
तिच्याबद्दल मनात विचारही नसतो
पण हळूहळू आपुलकी वाटते,
जिव्हाळा वाढतो.
ते प्रेम असते...!!!

प्रेम हे हळुवार उडणाऱ्या फुलपाखरासारखे असते,
हळूच ती व्यक्ती आपल्या मनात घर करून बसते.
मग रात्र असो का दिवस एकसारखेच वाटतात,
ते प्रेम असते...!!!

क्षणाक्षणाला तीचे विचार मनात येऊन जातात.
असा एकही दिवस नाही कि तिची आठवण येत नाही ,
ते प्रेम असते...!!!

तिचा चेहरा पाहिल्याशिवाय कधी झोप येत नाही.
आयुष्य अचानक रंगानी न्हाऊन निघतं,
आणि स्वप्नामध्ये एकच चित्र तयार होत असतं...
ते प्रेम असते...!!!

तिचे सुख ते माझे सुख,
तिचे दुःख ते माझे दुःख,
तिचा जीव तो माझा जीव,
आणि तिच्यासाठी माझा जीव...
असं काहीतरी होऊन बसतं...
ते प्रेम असते...!!!

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु........

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु....♥
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु...♥
कोणासाठी काहीही असलीस तरी
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु...♥

प्रेम म्हणजे............

५ वर्षाची मुलगी :-
प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेट काढणे पण तरी

त्याचे नेहमी तिथेच चोकलेट ठेवणे. ♥


१० वर्षाची मुलगी :-
प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने

मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥


१५ वर्षाची मुलगी
:-
प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर

त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥

१८ वर्षाची मुलगी :-
प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि

खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥

२१ वर्षाची मुलगी :-
प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने

त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥


२६ वर्षाची मुलगी :-
प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन

त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी. ♥


३५ वर्षाची स्त्री :-
प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक. ♥


६० वर्षाची स्त्री :-
प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥


८० वर्षाची स्त्री :-
प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन.. ♥

जवळ माझ्या नसलीस तरी.......

जवळ माझ्या नसलीस तरी...
सहवास मला तुझा आहे...
एकल्या ह्या जिवाला....
साथ फक्त तुझीच आहे....

संध्याकाळच्या वारया सोबत...
... मी तुझाच गंध अनुभवत असतो..
व्याकुळ करते तुझी आठवण..
अन श्वास घेणेही मी बंद करतो...

उघड्या डोळ्यांसमोर माझ्या...
तुझ्या आठवणींच पडदा पडतो....
जगाचा विसर पडतो मला...
असा तुझ्यात मी गुंततो

तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण...
माझ्या हृदयातुन पाझरतो...
अन विरह दु:खाने मग...
तोच गालावर ओघळतो.....

ही ओढ कसली लागली मला...
हे मला न उमजे....
सांग सखे यालाच का...
प्रेम म्हणतात सारे...?

माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जाने मला पसंद आहे.....

माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जाने मला पसंद
आहे
तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच
आनंद आहे.

तुला हसवण्यापेक्षा तुला रडवणे मला पसंद
आहे
मिट्टीत घेवून तुला समजावण्यात एक वेगळाच आनंद आहे.

... तुझ्या होकाराला नकार देणे मला पसंद आहे
तुला रागवलेली पाहण्यात एक वेगळाच
आनंद आहे.

माझ्यापेक्षा तुला सुखी ठेवणे मला पसंद आहे
तुझ्या सुखात आपले सुख समजण्यात एक
वेगळाच आनंद आहे.

तुझ्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहणे
मला पसंद आहे
वाहणारे अश्रू थांबवण्यात एक वेगळाच
आनंद आहे..

Friday, June 22, 2012

स्पर्श...........

दोन थेंब तुझ्यावर पडले आणि दोन
माझ्यावर,
.
... तुझ्या वर पडलेल्या त्या दोन
थेंबांचा मला राग आला
.
माझ्या परवानगी शिवाय त्यांनी स्पर्श
... केलाच कसा तुला?
.
पण काय करणार?दोष
तरी कोणाला देणार ?
.
ते थेंब पण माझे होते
आणि
त्या थेम्बानी भिजलेला हातातला तुझा फोटो सुद्धा माझाच
होता

आजही मला, एकटच बसायला आवडत.........

आजही मला,
एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...

कधी कधी हसायला,
कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत...
...
माझ्या काही शब्दांन मुळे, हरवल मी तुला,
आज त्या शब्दांना आठवून,
स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत...

अन तू नसतानाही,
ह्या आठवणींच्या विश्वात,
फक्त तुलाच पाहायला आवडत...
फक्त तुलाच पाहायला आवडत.

आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का..............

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का...

तुझे प्रत्येक दुख मला देऊन
सुखात माझ्या येशील का ...

एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का ...

... थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का ...

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का ..

तुझ्या हृदयातील प्रत्येकगोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आनशील का ...

प्रत्येक वेळेस डोळ्यातूनबोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का ...

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का ...

स्वप्नातल्या राजकुमार बरोबर
replace मला करशील का ...

आणी ह्या वेडयाच्या आयुष्यात
स्वप्नपरी म्हणून अवतरशीलका ...

आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का ...

मनाला एकदा आसेच विचारले का इतका तिच्यात गुंततो ?

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.
...
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

नात्यातले अनेक अर्थ उलगडुन सांगते ती मैञी.

नात्यातले अनेक अर्थ उलगडुन सांगते ती मैञी....
कधी रुसते कधी हसते तरी सदैव ह्रदयात वसते ती मैञी....
सारी संकटं दूर सारुन आपल हीत चिँतते ती मैञी....
आयुष्यातले नाजूक क्षण हळुवारपणे जपते ती मैञी....

यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे.

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.

कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि तीच्यासाठी मीही किँचीतसे झूरावे.

महिन्यातून एकदा तीने उगाचच रूसावे,
आणि मी मनवता-मनवता खुदकन हसावे.

... राञभर फोनवर तीने मला सतवावे,
दिवसभर मी तीला भेटीसाठी पटवावे.

कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई म्हणून मी तीच्यावर
रागवावे.

दोन दिवस अबोला पाळुन एकमेकांना आठवावे,
मग छोटेसे प्रेमपञ तीने मला पाठवावे.

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.

प्रेम मनापासून मनापर्यंत......

प्रेम मनापासून मनापर्यंत......

तू पण प्रेम केलस

मी पण प्रेम केलं

ना तू मला कधी विसरू शकलीस

ना मी तुला कधी विसरू शकलो
...
कारण आपण दोगान्ही जे प्रेमकेलं

ते असं तसं प्रेम न्हवतं

ते खरं प्रेम होतं

आणि खरं प्रेम मनापासून केलं जातं

आपलं प्रेम मनापासून मनापर्यंत पोहोचणारं होतं

आणि ते कधीच विसरण्या सारखंन्हवतं

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी कोण जाणे ती परी दिसते तरी कशी..................

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी

आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या

... बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं

का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...
कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात

तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं

बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान

तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!

का आवडतेस इतकी ?

का आवडतेस इतकी ?
का आवडतेस इतकी ?

कसं ग सांगू ..!!
तुझी काळजी आवडली मला,
तुझी हुरुहूर आवडली मला,
... तुझं रागावणं आवडलं मला,
तुझं समजावणं आवडलं मला,
चेहऱ्यापेक्षाही तुझं मन आवडलं मला.

नेहमी तुझं बोलणं मला खुपवेड लावतं,
नेहमी तुझ्याच सहवासात रहावं वाटतं,
जग मला म्हणेलही वेडा पर्वानाही मला,
इतकंच कळतंय कि "फक्त तूच आणि तुच
हवी मला".

नावापुढे माझ्या मला तुझंच नाव हवंय,
छोटंसंच घरकुल पण ते तुझ्यासोबत हवंय,
किती दिवसाचं आयुष्य माझं मला नाही ग
ठाऊक,
दिवस नाही ढकलायचे ग...मला तुझ्यासोबतचं
जगणं हवंय.

छळ म्हणून तरी एखाद्याने किती ग करावा ?
फक्त स्वप्नातच हात सांगना मी किती दिवस
धरावा ?
मनात ये माझ्या ते कधी न मोडण्यासाठी,
हातात घे हात माझा तो कधी न सोडण्यासाठी..!!

वाट पाहतोय मी.. तू वाऱ्यासारखी ये, पण माझ्या जवळच थांब नेहमी..
वाहून नको जाऊस
त्या वाऱ्यासारखी..दुसरीकडे..

एका मुलीने ने देवाला विचारलं...... प्रेम काय असत ?..........

एका मुलीने ने देवाला विचारलं......
प्रेम काय असत ?..........

बागेतून एक फुल घेवून ये...ती मुलगी फूल
आणायला गेली , तिला एक फूल आवडल , पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत , ती पुढे चालली गेली , पण तिला चांगल फूल
नाही मिळाल
...
जेव्हा ती परत तेच फूल
आणायला गेली , तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला.......

तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव
म्हणाला , " हेच आहे प्रेम " जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .... तेव्हा त्याची कदर
नाही करत , पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत

तू परत येऊ नकोस ..............

तू परत येऊ नकोस ,
जुन्या आठवणी जागवायाला ,
आधीच खुप दीवस लागलेत ,
मनावरी जखमा भरायला ...

दुःख अंतरी दाबुन ,
... एकांतामध्ये रडत असतो ,
म्हणुन का कोणास ठाउक,
सर्वांसोबत हसत असतो ...

तू आयुष्यात परत येऊ नकोस,
तूजे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय ,
तुझ्या आठवणी विसरायला...

पण ,
काहीही असले तरी ...
तुला शोधयाला तरी ,
नजर माझी फीरत असते ,
आकाशात चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटून येते ...

तुला विसर्नायाचा ,
अत्ता कुठे मी प्रयत्न करतोय ,
पण ही कवीता लिहता लिहता ,
पुन्हा तुलाच ग़ मी आठवतोय .

मनापासून ती खूप आवडते मला

मनापासून ती खूप आवडते मला
तिच्या मनातलं, पण माहीत नाही

मी दिलेल्या फुलांपैकी एकही फुल
तिच्या हृद्याच्या वहीत नाही

... श्वासाहून जास्त तिचे विचार येतात
ती विचारांच्या भानगडीत पडत नाही

म्हणते "मी भावनांच्या कुशीत गवसते"
पण विचारांच्या मिठीत सापडत नाही

डोळे तिचचं चित्र रेखाटतात
तिच्या डोळ्यांचं सांगू शकत नाही

दिसतो तिथे अधून मधून तसा
पण काजवा होऊन चमकत नाही

प्रत्येक स्वप्नात ती हजेरी लावते
तिच्या स्वप्नांचं सांगता येत नाही

समुद्राच्या वाळूत घर बांधायला
अजून तिचं मन तसदी घेत नाही

कदाचित तिच्या प्रेमात मी बुडतोय
ती बुडत असेल पटत नाही

दोघांच्या मनात एकसारखी क्रिया
घडत असेल असं वाटत नाही

थोड तरी बरोबर आहे म्हणतील या मुली...

समजून सगळे नासमज बनतात मुली.... चांगल्या चांगल्या मुलांना वेडयात काढतात या मुली....

बोलायला गेलो तर लाइन मारतोय म्हणतात या मुली....
मग नाहीच बोललो की शाइन मारतोय का म्हणतात या मुली?

मुद्द्याच बोलण थोड़च असत तरी चिव चिव चिव चिव खुप करतात... या मुली....
जेव्हा खरज बोलण्याची गरज असते.तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?

पावसात भिजायचं तर असत तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?
थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात...
मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली?

वाचून ही कविता चांगल्याच भडकतिल या मुली ...
मग (कदाचित) विचार करून मनात...
थोड तरी बरोबर आहे म्हणतील या मुली...

बोलताही येत नाही आणि लपविताही येत नाही,

बोलताही येत नाही आणि
लपविताही येत नाही,

तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगताही येत नाही,

... पहिले जेव्हा तुला फक्त
तुलाच बघत राहिलो,

फक्त तुलाच पहावे
असेच दिनक्रम करत राहिलो,

खरच तुझ्या नादाने मी
स्वता लाच हरवत राहिलो,

काय करू प्रेमाचा ताज
मला सजवीताही येत नाही,

बोलताही येत नाही आणि
लपविताही येत नाही ...

मला फक्त तुच हवी होतीस !! ( Mala FaKt TuCh Havi Hotis !!)

मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ,
ह्रदयाचा माझ्या केलास तु विनाकारणच खेळ.

मी म्हणालो नाही म्हणून काय ?
तूही म्हणायचं नव्हतसं.

... चुकलेल्याला वाट, तहानलेल्यांना विहीर,
आणि माझ्यासारख्यांना प्रेमाचा घाट,

का... तुला दाखवायचाचं नव्हतं.मला वाटलं तू समझशील,
अनं.... तु मला स्वीकार करशील.

नाही मजला तुझ्यापासून कोणतीचं आशा,
फ़क्त तुच आहेस माझ्या जीवनाची दिशा.

माझं मन झालय व्याकूळ फ़क्त तुझ्यासाठी,
करु नकोस दिशा भूल या ह्रदयाची.

मनातं आहे फ़क्त खंत तुझ्याच प्रेमाची,
देईन तुला मी साथ "सात जन्मांची

Wednesday, June 20, 2012

या websites ना मराठीत काय म्हणाल ?

facebook.com - थोबाड वही
twitter.com - चिवचिवाट
youtube.com - तू नळी
...orkut.com - किव्वा कुटा
yahoo - या (बरं का) हो
hotmail.com - गरम पोसट
linkedin.com - जोडलेले राहा
rediff.com - लाल जर
amazone.com - अम्माचे क्षेत्र
tumblr.com - तम्बरेल (लोटा)
delicious.com - चविष्ट
blogspot.com - कथा (कुटायचे) ठीकाण
myspace.com - माझी जागा
deviantART.com - देवी मुंगी (ची) कला
rapidshare.com - फटाफट वाटा
megavideo.com - दीर्घ चित्रफीत
playlist.com - यादी वाजवा..

बॉलिवूडवर मराठी फीव्हर.............

विद्या बालन मराठी स्टाइल आयटम साँगसाठी विशेष मेहनत घेतेय, राणी मुखजीर्ही तिच्या आगामी 'अय्या' सिनेमातून मराठी मुलगी साकारतेय. 'सिंघम'मधले मराठी डायलॉग आधीच गाजले आहेत. बॉलिवूडमधला मराठी टक्का वाढतोय...

...............

' आता माझी सटकलीय...' अजय देवगणच्या 'सिंघम' सिनेमातला हा डायलॉग तुफान लोकप्रिय झाला. या सिनेमातलाच 'आली रे आली, आता माझी बारी आली...' हा डागलॉगही असाच प्रसिद्ध झाला होता. असं काय वेगळं होतं या संवादांमध्ये? खास मराठी हेल काढत म्हटलेले हे संवाद महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जवळचे वाटले. त्या निमित्ताने 'सिंघम' आपला वाटला. त्यातच हिंदी सिनेमात प्रथमच मराठी संवाद मोठ्या प्रमाणात वापरल्याने इतर राज्यातील प्रेक्षकराजालाही त्याचे नावीन्य वाटलं. बघायला गेलं तर पंजाबी, बिहारी संस्कृतीचं दर्शन पाच पैकी तीन सिनेमांमध्ये दिसतच होतं. पण; आता मराठीचा टक्का वाढलाय हे नक्की. अन् हा टक्का 'लक्षवेधी'ही ठरतोय.

' हेराफेरी'मध्ये परेश रावलने साकारलेला बाबूराव आपटे आठवतोय ना? 'ए मराठी माणूस जागा हो', असे म्हणत 'जय महाराष्ट्र' असे नारे लावणाऱ्या परेश रावलची ही भूमिका खूपच गाजली. अनेक कार्यक्रमांमध्ये, पिकनिकला गेलेल्या ग्रुपमध्ये एखादं कॅरेक्टर हमखास बाबूराव आपटेची खास झलक पेश करत आजही टाळ्या मिळवतोच.

अर्थात तसं बघायला गेलं, तर हिंदी सिनेमांमध्ये मराठी व्यक्तिरेखा असणं काही नवं नाही. पूवीर् अशा भूमिका फक्त नोकरवर्गांपर्यंत सीमित असत, पण आता त्याच्या कक्षा रुंदावतयात. 'कमिने'मधली प्रियंका 'गुड्डू कुठाय?' असा प्रश्न विचारतच एन्ट्री करते. 'रात के ढाई बजे...' गाण्यातलं तिचं खास नऊवारी नेसून बिनधास्त नाचणं सध्याच्या जनरेशनच्या मुलींचं प्रतिनिधित्व करत होतं. एकूणच काय, तर मोठ्या प्रमाणात एखाद्या भाषेचा वापर करुन त्या, त्या राज्यातून अधिक गल्ला जमवायचं हे गणित निर्मात्यांना आवडतं अन् यात आता हॉट फेव्हरिट आहे ती मराठी भाषा... आणि असा सिनेमा तयार करून मासेस व क्लासेसकडून वाहवा मिळवत 'रिअलॅस्टिक' सिनेमा केल्याचं समाधानही सिनेमाच्या टीमला मिळतं.

सध्या गरमागरम असलेल्या या मराठी तडक्याची जादू इनकॅश करण्यासाठी बॉलिवूडमधील प्रत्येक जण सरसावलाय. एखादी व्यक्तिरेखा नसेल, तर आयटमसाँगही चालतं. कतरिना कैफचं मराठी इस्टाइल 'चिकनी चमेली' हे आयटम साँग यातलाच एक प्रकार. बरं चिकनी चमेलीची जादू ओसरत नाही तोवर विद्या बालन मस्त लाल रंगाची नऊवारी घालून आगामी 'फेरारी की सवारी'मध्ये आयटम साँग करण्यासाठी सज्ज झालीय. मागे एकदा म. टाच्या कार्यालयाला भेट द्यायला आलेल्या विद्याने, 'मला मराठी बोलता येत नाही, पण कळतं...' एवढं बऱ्यापैकी मराठीत बोलून दाखवलं होतं. आज हीच विद्या साडेचार मिनिटांच्या आयटमसाँगसाठी खास मराठी लटके, झटके शिकून घेतेय. कारण? कारण फक्त एकच या निमित्ताने त्या, त्या भाषिकांच्या प्रेक्षकांचा अधिक जवळ जाता येतं.

यश चोप्रा, करण जोहर यांच्या सिनेमातून सातत्यानं होणारा पंजाबीचा भडीमार आता काहीसा कंटावाळाणाही वाटू लागला होता. म्हणूनच चोप्रांनीदेखील दोन वर्षांपूवीर् आलेल्या आपल्या प्रॉडक्शच्या 'लफंगे परिंदे' मधून पिंकी पालकर (दीपिका पडुकोण), नंदन कामठेकर उर्फ वनशॉट नंदू (नील नितीन मुकेश) या मुख्य मराठी व्यक्तिरेखा उभ्या केल्या होत्या. खासकरुन दीपिकाच्या मराठी संवादांमध्ये असलेली सफाई मराठी प्रेक्षकांना आवडली होती. हो, हा सिनेमा चालला नाही, त्यामागची कारणं वेगळी असतील. पण; म्हणून मराठी फीव्हर कमी झाला नाही. अनुराग कश्यप निमिर्त व सचिन कुंडलकर दिग्दशिर्त 'अय्या' सिनेमा, तर 'सिंघम'सारखाच बऱ्यापैकी मराठी संवादांची रेलचेल असलेला असेल. राणी मुखजीर् यात महाराष्ट्रीयन मुलीची भूमिका साकारतेय. विनोदी अंगाने जाणाऱ्या कथेतील मराठी मुलीच्या भूमिकेत फिट बसण्यासाठी राणी खूपच मेहनत घेतेय. यासाठी तिने अमृता सुभाषची मदत घेतलीय. कपडे, केशभूषा यांच्यावरही राणी विशेष मेहनत घेताना दिसतेय; जेणेकरुन फक्त संवादच नव्हे तर तिचा पेहराव व वावर यावरुनही तीचं मराठीपण दिसेल...

अर्थात हे सगळं भूमिकेच्या तयारीसाठी किंवा मराठी प्रेक्षकांना अधिकाधिक आपल्या 'प्रॉडक्ट'कडे खेचण्याचं गिमिक म्हणावं लागेल. पण; आपण ज्या राज्यात राहतो तिथली भाषा अवगत असावी म्हणून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने खास मराठीची शिकवणी, सुरू केलीय ही बाब त्याहीपेक्षा खास आहे.

मराठी निमिर्तीतही बॉलीवूडकरांचा पुढाकार

गेल्यावषीर् आलेल्या 'ताऱ्यांचं बेट'नं एकता कपूर व शोभा कपूर यांनी मराठी चित्रपट निमिर्तीत पाऊल टाकलं. आता रितेश देशमुख, अक्षयकुमार ही बॉलिवूडमधील प्रस्थापित मंडळीही मराठी चित्रपट निमिर्तीत पाऊल ठेवत आहेत. अमिताभ बच्चन यांनीही 'विहिर' सिनेमाची निमिर्ती केली आहे. महेश मांजरेकरही त्याच्या 'शिक्षणाच्या आयचा घो' या सिनेमाचा हिंदी रिमेक करण्याच्या विचारात आहे.

Friday, June 15, 2012

कॉलेजचा पहिला दिवस.......

मी कॉलेजचा पहिला दिवस अजून सुद्धा आठवत होतो
त्यादिवशी वर जायचं कसं? ह्या भीती मुळे खालीच उभा होतो
खरतर कोणी नाही आहे आपल्या सोबत ह्याचाच विचार करत होतो
मला तर सगळ नवीन आहे, म्हणून फार अडखळत होतो
भीतभीतच का होई ना एक एक करत कॉलेज च्या पायरया चढत होतो
आठवतंय मला वर्गात सुद्धा एकटाच बेंच वर बसलो होतो
सुरवातीलाच काही अविस्मरणीय मित्राची ओळख झाली, धन्यवाद करतो त्यांना,
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये घालवलेला एक एक क्षण आठवत होतो
अजून काही मित्राची ओळख होवू दे, म्हणून वर्गातच बसलो होतो
नवीन नवीन होते कॉलेज म्हणून सर्व लेक्चर बसत होतो
समजत नव्ह्त सुरवातीला की, तरी मन लावून ऐकत होतो
नवीन नवीन असताना कॉलेज, मी कॉलेजला रोज येत होतो
पण कॉलेज सुटल्यावर मात्र खूप वेळ त्या मित्रासोबतच फिरत होतो
विसरू न शकणाऱ्या, त्या सर्व आठवणी, मला कोणी पुन्हा आणून द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

वर्गात मित्रासोबत घालवलेला एक एक क्षण पुन्हा आठवत होतो
बेंचवर सर्व मित्र एकाच बाजूला, ग्रुप नेच बसत होतो
सर जे काही सांगतात, त्यातल काही काहीच लिहित होतो
वहीवर नाही म्हणून काय झाले? बेंचवर सर्व कोरत होतो
सर्व मित्राची नावे पाठ होती, तरी बेंचवर लिहून काढत होतो
वहीची मागची पाने तर नवीन नवीन खेळ खेळूनच भरून घेत होतो
आता पुढे कोठल्याही खुर्चीत बसलो तरी पुन्हा एकदा बेंचवर बसू द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये मित्रांबरोबर फिरलेला एक एक क्षण अजून एकदा आठवत होतो
वर्गातून कोणाला बाहेर काढलं तर सर्वच बाहेर जात होतो
वर्गात कमी पण कॉलेज समोर कट्ट्यावर रोज तासन तास गप्पा मारत होतो
नंतर नंतर सारे, डेफोल्तर (defaulter) लागलेल्या लेक्चरलाच बसत होतो
सकाळी सकाळी पहिल्या लेक्चरला फक्त चहाच पियुन येत होतो
म्हणून सारे जण त्या वडापावच्या गाडीवर रोजच जात होतो
ती कॉलेज ची सर्व वर्षे पुन्हा एकदा कोणीतरी <<<rewind करा ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये मित्रासोबत घालवलेले सर्व दिवस पुन्हा एकदा आठवत होतो
प्रोजेक्ट च्या नावाखाली भरपूर वेळा सायबर ला जात होतो
वर्षाच्या शेवटी शेवटी IMP QSTNS साठी वह्यासाठी फिरत होतो
परीक्षेच्या दिवशी मात्र रात्र रात्र भर जागत होतो
दगडूशेठला  आम्ही सर्व परीक्षेच्या नंतरच जात होतो
FIRST CLASS, SECOND CLASS कशाला? पासा पुरतेच मार्क काढत होतो
अभ्यास थोडासाच करून पास झाल्याचा आनंद पुन्हा एकदा घेवू द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज नियम सुद्धा पुन्हा एकदा आठवून बघत होतो
कॉलेज चा आय.डी. मात्र कोणी सांगितल्या वरच  घालत होतो
लाय्बरी मध्ये तासन तास, फक्त गप्पा मारायलाच बसत होतो
लेक्चर मध्ये मात्र पुस्तकात कमी पण MOBILE वरच जास्त लक्ष देत होतो
RECESS मध्ये सारे मित्र CORRIDOR मध्ये खूप ओरडत होतो
कॉलेज चे नियम मात्र काही जनासामोरच पाळत होतो
COLLEGE चे RULES & REGULATIONS पुन्हा एकदा BREAK करू द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

ह्यापुढे काय होईल आपले, ह्याचा आता विचार करत होतो
आता सुद्धा मी त्याच आठवणी काढत होतो
येथून पुढे सगळ्यांना लक्षात ठेवू, म्हणून मनालाच बजावत होतो,
एवड्या लवकर का संपले कॉलेज ? म्हणून वेळेला दोष देत होतो
असे वाटत मी लहानपणा पासूनच कॉलेज ला जायला पाहिजे   होतो
परत चालू व्हावं माझे कॉलेज म्हणून देवालाच विनवत होतो
हे सगळे आठवल्य तर रडायला येतंय, एकदा तरी थोडेसे रडू द्या ना
मला कॉलेज ला पुन्हा जायचं ! हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी,.........

♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी, ♥
प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
प्रेयसी :- सहीच, मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-))
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस ???
प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥ ♥

एका मुलाची कथा ७ वी ला असताना.......

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी"बेस्ट फ्रेंड"होती ...
मला ती खरच खूप आवडायची I
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
"माहित नाही का.....??":(((

कॉलेग ला असताना

माझ्या फोन वर call आला...
तिचा चा होता तो ...
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती
आणि ती मला सांगत होती तिचा ज्याच्या वर प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला...
तिने मला भेटायला बोलवलं होत
मी तिला भेटायला गेलो...
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...
मी तिच्या साठी आणि माझ्या साठी चित्रपटाची तिकीट काढली...
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं"बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."
खूप वेळा शांत उभे होतो...
मग मी निघालो...
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...
माहित नाही का???
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडी त जायचं
ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली...
माझ्या सोबत कोणी नाही आहे... रु माझ्या सोबत येशील...
माझ्या सोबत हि कोणी नव्हत...
आम्ही दोघांनी"बेस्ट फ्रेंड्स"ह्या नात्याने जाण्याचा नित्नय घेतला ...

PROM निघत ला ...

prom NIGHT ला सगळ काही नित झाल..
आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...
ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...

GRADUATION दय ला ...

दिवसा मागून दिवस गेले...
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच was graduation दय आला ...
मी तिला पाहिलं ...
तीनेव साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..
माझा तिच्या वर एका तर्फी प्रेम होत पण काय करणार तिचा जमत नव्हत ना
आमची शेवरी ची भेट होणार होती...
ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...
तिने माझ्या चेहर्या वरून हात फिरवला ...
आणि म्हटली"आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला

काही वर्षांनी

मी लग्नात आलो होतो...
आणि ते लग्न होत तीच .. तिचा दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्त चा नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेव्चा निभावल....
"तू आज हि माझ्या सोबत आहेस"असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी...
मी आमच्या शाळेत एकदा गेलो ...
तिथे आमच्या वर्गातले सगळे जन आले होते...
ती हि...
तिथे प्रत्येकाने आपली लहान पाणी लिहिलेली पत्र ठेवली होती...
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...
7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा"
college year:"आज हि मी त्याला खोत सांगितलं कि माझं ब्रेअक उप झाला तरी हा वेडा माझ्या साठी आलं"
prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बगहातेय,...
मला त्याला सांगावस वाटतंय कि माझा हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."
graduation year:"किती लाजाळू आहे हा साडीत पाहून नाही काही बोलला नाही"
marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील....."

हे सगळं वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...
आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...
कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला..

Heart Touching लव्ह स्टोरी...

जायश्री:- "हो योगेश, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे "
योगेश:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"
जायश्री :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Yogesh ........!!

(10 दिवसांनतर)

राहुल :- "जायश्री एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......
तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,
त्या पत्रात लिहिले होते की, "जायश्री मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"

I love you and now have a long love life ahead.
फक्त तुझाच, स्वर्गवासी (हृदयवासी) योगेश.....

मराठी लव्ह स्टोरीज ................

विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी.

कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे

ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी

सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही

अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत.

प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विक‍ीची आणि विकीचा इतर

मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.

विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे. विकीवरही प्रियाच्या

आईवडीलांचा चांगलाच विश्वास बसला होता तर विकीच्या घरी त्याच्यापेक्षा

प्रियाचेच जास्त लाड केले जात होते. त्यामुळे दोघांचे एकमेकांसोबत एकाच गाडीवर

फिरणे, सोबत सिनेमा पाहणं नेहमीचेच झाले होते. दोघंही सिन्सियर असल्याने गेल्या

सात वर्षांपासून कुठलेही भांडण न होता त्यांची मैत्री कायम होती.

कॉलेजात विकी व प्रिया नेहमीच सोबत फिरत असल्याने त्याच्या गैरहजेरीत त्यांच्या

इतर मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांच्याविषयी निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जायचे.

प्रिया दिसली रे दिसली की, विकीचे मित्र तिला ‍चिडवायचे. मात्र, प्रियाला

कॉलेजातील वातावरण चांगलेच माहित असल्याने ती त्याकडे फारसे लक्ष देत नव्हती.

मात्र, विकीच्या मनात प्रियाविषयीच्या प्रेमाचे बी पेरले गेले होते. त्यात

मित्र त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवत होते.

मग काय विकी चांगलाच फॉर्ममध्ये आला होता. नेहमीपेक्षा प्रियाची तो जरा जास्त

काळजी घेत होता. विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला

नव्हता. विकीच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल झाला होता.

एकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दरम्यान प्रियाला

पाहण्यासाठी मुलाकडचे आले होते व त्यांनी प्रिया पसंत असल्याचे सांगितले.

प्रियालाही तो मुलगा आवडला होता. पाहुणे गेल्यानंतर लागलीच प्रियाने विकीला

मोबाइल करून लग्न ठरल्याची बातमी त्याला सगळ्यात आधी त्याला सांगितली. प्रियाचे

लग्न ठरल्याचे ऐकून विकीच्या पायाखालची वाळूच सरकली. सात वर्षापासून प्रियाच्या

निस्सिम मैत्रीला विकी प्रेम समजून बसला होता.

मोबाईलवर तिच्याशी संवाद साधत असताना विकीची जीभ अडखळत होती. मोठ्या हिमतीने

त्याने प्रियाचे अभिनंदन केले. मात्र बाहेरगावाहून आल्यानंतर विकी प्रियाला

टाळू लागला. कॉलेजातह‍ी तो आता तिच्यासोबत न फिरता त्याच्या मित्रांमध्येच वेळ

घालवू लागला. मुकेश, मोहम्मद रफीची दुःखद गाणी ऐकायला लागला. एकांतात रहायला

लागला. प्रियाने आणि त्याच्या घरच्यांनीही त्याला खूप समजावले. पण काहीही उपयोग

झाला नाही.

प्रियासोबत घालवलेले 'मैत्री'चे क्षण विसरण्यासाठी विकीला सिगारेट ओढण्याची सवय

जडली. प्रिया रस्त्याने दिसली की, तिच्यासमोर सिनेस्टाइलमध्ये सिगारेट ओढून

मित्रांमध्ये दर्द भरे नगमे मोठमोठ्याने गायचा. त्याचे प्रियाला खूप वाईट

वाटायचे. जणू त्याचा 'देवदास' झाला होता.

मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली

प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता.

सात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून गेली नसती.

एक ग्रेट लव्ह स्टोरी......

एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती. खूप खुश होती ती.
आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी मिळणार होती. ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती.
तेव्हड्यात तिचा प्रियकर आला ...त्याला बघून तिला खूप आनंद झाला ...... त्याने तिला Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून ... teddy bear दिला ........... teddy bear बघून ती नाराज झाली , कारण…………….. तिला अंगठी पाहिजे होती ..... ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला. .......... रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला गेला आणि…………….. आणि तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...आणि तो जागीच मरण पावला. हे पाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउस पडू लागला .... आक्रोश करून ती रडू लागली . ......आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली ....तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि, " प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे,

प्रेयसी.....

♥ ♥ ♥
"प्रेयसी :- कसला विचार करतोस ?
प्रियकर :- मी विचार करतोय त्या वेळेचा, ज्या वेळेस पृथ्वीवर पाठविण्यासाठी देव तुला तयार करत होता ......!!!
प्रेयसी :- wow !! Interesting ♥ ....... मग पुढे ???
प्रियकर :- ती वेळ देवासाठी नक्कीच अवघड गेली असणार, देव खूप गोंधळला असणार .....
प्रेयसी :- असे का ?
प्रियकर :- कारण प्रत्येक जणाने तुला मिळवण्यासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना केलेली असणार."

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा.......



एक मुलगा तिच्या GF
च्या रोजच्या SMS
( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने
त्रासला होता .
एके दिवशी तो एक SMS RECIVE
करतो पण न वाचताच झोपतो......
दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन
येतो ...♥♥♥

कि काल रात्री तिची मुलगी कार
अपघातात मरण पावली ....
..तो गोंधळतो आणि
तो मुलगा फोन मधील SMS
वाचतो....."DEAR PLEASE तुझ्या घरासमोर
ये ,माझा अपघात
झाला आहे........

♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ..."
पण तो कमनशिबी मुलगा
तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥

यावरून मला तुम्हाला एवढाच
सांगावेसे
वाटते कि
आपल्या जवळच्या ,
आपल्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका.....
कारण ती व्यक्ती आपल्यावर
मनापासून
प्रेम करत
असते.........♥♥♥

Monday, June 11, 2012

किती छान असतो न हा खेळ मनाचा........

किती छान असतो न हा खेळ मनाचा...
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा...

किती छान असतो न हा खेळ मनाचा...
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा...

किती छान असतो न हा खेळ मनाचा...
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा...
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा...

किती छान असतो न हा खेळ मनाचा...
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा...

किती छान असतो न हा खेळ मनाचा...
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा...
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा...

खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा...
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा... मनालाच फसवण्याचा !!!!!!!

प्रेयसी माझी.........

तिला म्हणालो,मला आज काल झोप येत नाही
काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स
उघडली झोपेची गोळी काढून माझ्या हातावरती दिली. ......
काय सांगू तुम्हाला, माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एसआहे.

मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली, धीरधर अजुन थोडासाच उशीर
आहे.
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्त तपासणी शिबीर आहे.......
काय सांगू तुम्हाला, माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्या क्षणी ती उठली, आणिआत निघून गेली.
माघारी येताना हाती "डिसेक्शनबोक्स" घेवून
आली......
मित्रांनो अशीही, माझी वेगळीच केस आहे. अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.
तिने तिची ओढणी, माझ्या पायावरती बांधली.
नजरेस नजर मिळवून माझ्या, हळूचती म्हणाली.
पडलास तू, पण जखम माझ्या काळजावरती झाली..

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस .............

आयुष्यभर हसवेन तुला
पण मला कधी रडवून जाऊ नकोस ,

काळजी घेईन तुझी जीवापाड
पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस ,

शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल तुझी
पण मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस ,

तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेल
पण Plzzz मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस...!!!...

ती बोलत तर नाही, तीचे डोळे खुप बोलतात.............

ती बोलत तर नाही,
तीचे डोळे खुप बोलतात,

मी फक्त पाहात राहतो
पाय आपोआप तीच्याकडे वळतात.

सतत कसला तरी
वीचार करत असते,

काय माहीत तीच्या
मनात काय चालते.

हासतानाही ती खुप
कमी हासु पाहते,

पण हासताना तीच्या
गालावर खळी पडते.

ती उभी असते तीथेच
कुठेतरी मी ही उभा राहतो,

ती जवळ नसली तरी
सहवास तीचा मला जाणवतो.

खरच भीती वाटते
मला तीच्या जाण्याची,

माझ्या कवीतेत पुन्हा
काळोख येण्याची.

ती आली होती प्रकाश
बनुन माझ्या जीवनात,

आता जाणवतो सहवास
तीचा ह्रदयाच्य स्पंदनात.

आता वाटते मला तीनेही
माझ्यावर प्रेम करावे,

फक्त तीच्यासाठी असलेलं
माझे प्रेम एकतर्फी नसावे.

ती दिसली.......

ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मीबिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातूनउमललेले.....

म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड
कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीचभरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड
मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द
राहून.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव
राहिली ती या वेड्या मनाची.....
 

हवं असतं कुणीतरी ..........

हवं असतं कुणीतरी
तुमच्याशी भांडणारं
भांडल्यावर देखील तुमच्या
वाट्यात वाटा मागणारं

हवं असतं कुणीतरी
तुमची वाट पाहणारं
तुम्ही रागावुन गेल्यावर
ओले डोळे टीपणारं

खरंच असावं कुणीतरी…
खरंच असावं कुणीतरी
कडाडुन भांडणारं
सारं भांडुन झाल्यावर
मायेनं बिलगणारं..

सवय आहे... तुझी वाट पहाण्याची.......

सवय आहे...
तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसतानाही...

सवय आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची...
तू ऐकत नसतानाही....

सवय आहे...
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसतानाही..

सवय आहे...
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट
बघण्याची... तो येणार नसतानाही....

सवय आहे...
मन मारून झोपण्याची....
झोप येणार नसतानाही...

सवय आहे...
अशा कित्येक सवयी सोबत घेउनजगण्याची... तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही.

सगळे म्हणतात कविता जमायला प्रेमात पडावे लागते.......

मला कधी ते जमलेच नाही,
कधी कुणावर प्रेम जडलेच नाही....

असेच झाले एकेदिवशी, वारा जोराचा वाहूलागला,

समोर येताच ती वादळ मनात निर्माण करूनगेला...

पाहताच क्षणी तिला हृदयाचे ठोके वाढले,

का कुणास ठाऊक पावले आपोआप तिच्या मागे वळली...

त्याच क्षणी ठरवले आता आपण सुधरायाचे,

एकदा का होईना जाऊन तिच्याशी बोलायचे...

पण मला कधी ते जमलेच नाही,

कारण कधी कुणावर प्रेम जडलेच नाही...

निघून गेले दिवस, निघून गेली वेळ,

माझ्या मनाचा मी करून घेतलाहोता खेळ...

सावरण्याचा खूप प्रयत्न केला...

पण कधी मला ते जमलेच नाही,

कारण कधी कुणावर प्रेम जडलेच नाही...

आजही तिच्या आठवणीत मी रडत आहे,

तिच्या एका भेटीसाठी माझे मन झुरत आहे...

मनाला समजवायला सुरुवात केली आहे...

"माझे कधी कुणावर प्रेम जडलेच नाही"...

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते...

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते...

कोण ग तो तुझा म्हटल्यावर
झुकलेली नजर आणि गुलाबी झालेले गाल बघून,
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....

रोज निरोप घेताना पुन्हा कधी भेटशील
म्हणताना,
पाणावलेले डोळे आणि कपकपनारा कंठ बघून,
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....

कारण नसताना तासभर फोनवर भांडायचा
स्वतः राग करून फोनही ठेवायचं,
फोन ठेवल्यानंतर मिनिटात आलेला
आय लव यु चा म्यासेग बघून,
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....

नकळत स्पर्श झाल्यावर
तिच्या हृदयाचा चुकणार ठोका आणि
थरथरणारे ओठ बघून,
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे
वाटत......

तु प्रेम आहेस माझं..........

तु प्रेम आहेस माझं,
वाळवंटातल्या हिरवळीसारखं,
मनाला शांत करणारं..

तु प्रेम आहेस माझं,
पहिल्या पावसासारखं,
चिंब भिजावं असं वाटण्यासारखं..

तु प्रेम आहेस माझं,
पौर्णिमेच्या चंद्रासारखं,
माझ्या भावनांना भरती आणणारं ..

तु प्रेम आहेस माझं,
अमृतासारखं ,
माझ्या प्रेमाला अमर करणारं..

तु प्रेम आहेस माझं,
गुलाबाच्या कळीसारखं,
नाजूक, सुंदर, हवहवसं वाटणारं..

तु प्रेम आहेस माझं,
इंद्रधनुष्या सारखं,
माझ्या आयुष्याला सप्तरंगांनी भरणारं ..

तु प्रेम आहेस माझं,
तु प्रेम आहेस माझं

येवुन मिठीत आज म्हणाली...........

येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा.......
मनाला दुसरं काही रुचत नाही

सांग ना रे हल्ली असं का होतय
मन सारखं तुझ्याकडे झेप घेतय
नाही ते आज था-यावर......
सारखं हिंडतय बघ वा-यावर

खरचं मला तुझी लागली ओढ
का नाही लागणार तू आहेसच गोड
चल ना रे कुठेतरी दूर जाऊ.......
काही क्षण का होईना सहवासात राहू

अरे असा लगेच रागावतोस काय
ऐकना रे.....तुझ्या शिवाय करमतच न्हाय
सांग ना कधी नेतोस घरी.......
माप ओलांडायचय मला येवून दारी...

चल ना लवकर ने ना रे मला
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
किती त्रास देशील मनाला.......
मनाला दुसरं काही रुचत नाही

अस कुणीतरी जिवनात याव्......

अस कुणीतरी जिवनात याव्
" तु माझा ,तु माझा ,"म्हणत्
प्रेमाने जवळ घ्याव्,
फक्त तिअच्य स्पर्शाने
अंगावर रोमांच याव्,

अस कुणीतरी जिवनात याव्
सुखाच्या क्षणात्
मनापासुन हसवाव्,
दु:खात माझ्या
सहभागी व्हाव्,

अस कुणीतरी जिवनात याव्
ऊनात चालताना
साथ दयावी,
पावसात त्याची
सोबत असावी,
थंडीत त्याची
साथ असावी,

अस कुणीतरी जिवनात याव्
फक्त त्याचा चेहरा पाहील्यावर्
ओठावार हास्य याव्,
कधीतरी रुसल्यावार्
अलगद मिठीत घ्याव्,

अस कुणीतरी जिवनात याव्
प्रत्येक दिवसाची पहाट
ज्याच्या सोबतीने व्हावी,
फक्त अर्ध्यावर साथ न सोडता
आयुष्य भराची साथ दयावी

आठवणी...........

आठवणी तुझ्या मनाचा माझ्या कानोसा घेऊन जातील्..

आठवण तुझी येताच मग पापण्याँत अश्रु येऊ लागतील्..

नसशील तेव्हा तु तर मनाला फारच वाईट वाटेल..

तर मग माझ्या मनाला तुझ्या फारच जवळ आणावे लागेल्..

मग एकदातरी तुला डोळे भरुन पहावेसे वाटेल्...

फक्त आणी फक्त तुलाच आठवावस वाटेल...

सांग ना या वेड्याची तुला कधी माझी आठवण येईल का?

या वेड्याला आठवुन चेहर्यावर कधी स्मीतहास्य आणशील का?


प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही.


रेयसी -चौकातील मुले आणि बाकी लोक
आपल्याकडे संशयाने बघतात.नावे ठेवतात.त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत .मला नाही आवडत असं.अशाने खर्या प्रेमाची किंमत कमी होते ना ..?

हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत
किती....?

प्रेयसी - पाचशे ... प्रियकर ती नोट
चुरगाळतो आणि आता ह्याची किंमत
किती ..?

प्रेयसी - पाचशेच....

प्रियकर - ती नोट खाली टाकतो..धुळीत
मिळवतो...आता ह्याची किंमत किती...??

प्रेयसी - पाचशेच

प्रियकर - हं बरोबर .. आपले प्रेम
सुद्धा असेच आहे सोनू..
लोकांनी कितीही नावे ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच कमी होणार नाही.....!

ती दोघं...

त्यांच बिनसलच होत गेले काही दिवस
तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ
काढायची..
तो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण
ते भांडण मिटवायच म्हणून तो तिला सिनेमाला घेऊन गेला
पण ती गप्पच होती,शांत होती, काहीच बोलायला तयार नव्हती. तिचा चेहराच सांगत होता कि , तिचा निर्णय झालेला होता..
ते घरी परतत होते. तो गाडी चालवत होता.
शेवटी न राहवून ती त्याला म्हणालीच..
"मला वाटत..हे अस रेटण्यात
आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही..मला वाटत आपण आपापल्यां वेगळ्या वाटांनी जाव..मी तरी तसा निर्णय घेतलाय..यापुढे आपण न भेटनच योग्य...!
ते ऐकून त्याला धक्काच बसला..
त्यान गाडी स्लो करत रस्त्याच्या एका बाजूला नेऊन थांबवली त्याचे डोळे पाण्याने डबडबले ,
त्यान खिशात चाचपून पाहिलं.एक कागदाच चीटोर तिच्या हातात देत डोळे पुसले..
आणि ती चिट्ठी उघडून वाचणार तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली.. थेट यांच्या गाडीवरच येऊन आदळली..
त्या अपघातात 'तो' जागीच ठार झाला..आणि तिला मात्र किरकोळ जखम झाली... हातात ते चीटोर तसंच होत..
ते एकदम उघडून तीन पाहिलं तर
त्यावर फक्त एकच वाक्य
लिहिलेलं होत ..

'तुझ्याशिवाय जगण शक्य नाही, तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन...!
...तो खरच त्याक्षणी मेला होता..
प्रेम असंही असत...जे मागू ते देऊन
मोकळ होत..
मागायचं काय, मरण कि जगण... हे प्रेम करणाऱ्यांनाच ठरवावं
लागत....!

Saturday, June 9, 2012

वेळ असेल तुला तर

वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का....
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...?...

पूर्वी तू माझ्याशी
खुप काही बोलायचीस वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस
तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचीस

नसले विषय तरी
नविन विषय काढायचीस...
काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचीस

माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचीस
आता कशाला आमची गरज पडेल
असं म्हणून सारख चिडवायचीस,

माझा चेहरा पडला तर
खुप नाराज व्हायचीस
मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचीस...

आज ही मला तुझा
प्रत्येक क्षणी भास होतो
का गं अशी वागतेस का देतेस त्रास

नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर माझा श्वास
शेवटचं एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास...

वेळ असेल तुला तर एकदाच मला भेटशील का
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...
शेवटचं एकदाच मला भेटशील का...?

का बरं माझ्यासोबत असे घडावे ??

का बरं माझ्यासोबत असे घडावे ??

खरे प्रेम असुनही माझे ते न मिळावे..
कदाचित माझे नशिबचं फुटके असावे,
का बरं मी आता का पुन्हा प्रेमात पडावे..

का कुणी सोडून गेल्याचं दुःख करत बसावे,
का बरं मी पुन्हा खोट्या नात्यात फसावे..
त्याच्या खोट्या रुसण्यावर का मी मनवावे,
का बरं मी कुणासाठी उगाचं झुरावे..

त्याला मिळवण्यासाठी देवाकडे
प्रेमाची भिक का मागावे,
तो नाही मिळाल्यावर त्याची आठवण
काढुन रडत बसावे..

मग त्याला विसरण्यासाठी नको नको फसवे
प्रयत्न करावे,
का बरं माझ्यासोबत असे घडावे ??

आता असं वाटतं कुठे दूरजाऊन शांतपणे
मरावे..
आता असं वाटतं कुठे दूरजाऊन शांतपणे
मरावे..

सुरु होण्याआधी संपली हि कहाणी..

सुरु होण्याआधी संपली हि कहाणी..
साक्षीला उरले फक्त डोळ्यात
पाणी...

नकळत तुझे आयुष्यातून निघून
जाणे..
जशी फुललेली बाग क्षणात ओसाड
होणे..

अश्रुनी दाटलेल्या डोळ्यांनी तुला शेवटचे
पाहणे..
भर उन्हाळ्यात मग पावसाचे आगमन
होणे..

तुझ्या आठवणीने पापणीचे..
ओलचिंब होवून जाणे ..
शांत अशा सागरात लाटेचे ते
उसळून येणे.

तुझ्या आठवणीरुपी सागराला शांत
कसे करता येईल...
हृदयात कोरलेल्या आठवणी कशा पुसता येतील...

Thursday, June 7, 2012

पहिलं प्रेम कसं विसरायचं ...?

त्या दोघांचे एकमेकांवर
जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच.
तिच्यासाठी काय करु
आणि काय नको असं
त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम
फ़ाटलेला.
कडकाच होता बिचारा. पण
भलताच romantic .
तिच्याशिवाय
जगण्याची कल्पनाही त्याला करवत
नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं
त्याला मनापासुन
वाटतं होतं. पण द्यायच काय...?
खिशात तर
दिडक्या नाहीत..शेवटी न...राहवुन
त्याने तिला रंगीत
कागदांची फ़ुलंच प्रेझेण्टकेली.. ती खुष
होती..तशीही तिची त्याच्याकडुन
फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे
देत होता त्यात
ती समाधानीच होती..
तसाही तो सामन्यच होता.
जेमतेम नोकरी.. भविष्यात
काही करुन दाखवेल असं
पाणीही त्याच्यात दिसत
नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात
आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच
पालटला..ती म्हणाली,"तुझ्या
बरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे
नेहमी असं रडखड्त, मन मारतचं
जगावं लागेल..काय सुखात
ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? -
तर काहीच
नाहि...मी परदेशी चालले
आहे..पुन्हा कधीच परत येणार
नाही..तु मला विसर. आजपासुन
आपले मार्ग निराळे.. माझा-
तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली... हा मॊडुन
पडला....संपलाच जणु
काही....सर्व काही संपले
त्याच्यासाठी..
दिवस सरले
आणि याच्या मनातली दु:खाची लाट
ऒसरुन
संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने
ठरवलं, ’ तिने
पॆशांसाठी आपल्याला सोडलं
ना..? मग आता पॆसाच कमवुन
दाखवायचा.
इतका की आपल्यापुढे सारं जगतिला थिटं
दिसलं पाहिजे..’ पुढे..या जिद्दीने पेटुन
उठ्ला तो..झोकुन दिलं
स्वतःला..! कष्ट केले..राब राब
राबला..मित्रांन ी मदत
केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे
दिवस पालटले..तो खुप श्रींमत
झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा,
नोकर, चाकर, गाड्या,
मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन,
प्रेमभंगाच्या अपमानास्पद
दुःखातुन तो बाहेर
पडला..उभा राहिला..जगण्यास
ाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण
तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच
होती..ती सोडुन
गेल्याची..तिनं
नाकारल्याची..आप
ल्या गरीबीचा अपमान
केल्याची..तिच्य
ावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने
घेतली होती..एक दिवस
त्याच्या आलिशान गाडीतुन
तो जात होता..बाहेर मुसळधार
पाऊस पडत
होता..गाडिच्या काचेतुन
बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं
एकाच छत्रीत
कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या
त्या दोघांना पाऊल उचलणं
अवघड झालं होतं..त्याने
गाडी थांबवली..आणि नीट
पाहीलं..हे ’ तिचेच’ आई-वडील.!! त्याने
त्यांच्याजवळ
गाडी थांबवली..त्यांन
ा गाडीत बसण्याचा आग्रह
करावा असं त्याला वाटत होत..
त्याच्या मनातली सुडाची आग
जागी झाली होती..
त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून
त्यांच्या लेकीनं जे काय केलं
त्याचा पश्चाताप व्हावा..असं
त्याला मनोमन वाटतं
होत..तिला धडा शिकवण्याच्या..
अपमानाच्या घावांची परतफ़ेड
करण्याच्या एका वळणावर आपण
आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे
मात्र स्मशान भुमीकडे
थकल्या खाद्यांने चालतच
राहातात..हा गाडीतुन उतरुन
त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.." तिचाच
फ़ोटो..तसाच
हसरा चेहरा...आणि कबरीजवळ
ठेवलेली त्याने
दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच
गेला कबरीकडे...तिच्य
ा आईबाबांना विचारलं...काय
झालं ते सांगा.... ते
म्हणाले..."ती परदेशी कधीच
गेली नाही.तिला'कर्कर ोग’
झाला होता..तो झाल्याचं कळलं
तेव्हा थोडे दिवस होते
तिच्या हातात...आपल्या अकालीजाण्याचं
दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन
प्रेमभंगाचा चटका देवुन
ती गेली..तू संतापुन
उभा राहशील..जगशील.. यावर
तिचा विश्वास होता..,
म्हणुन तिनं तुला सोडुन
जाण्याचा नाटक केले........
ती गेली...आणि तू जगलासं...

पहिलं प्रेम कसं विसरायचं (प्रेम कथा)....?

एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून जात होते, मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत होता, मुलगी घाबरली तिने त्याला हळू चालवायला सांगितले.... मुलगा : मला आय लव यु बोल... मुलगी : आय लव यु, आता तरी हळू चालव... मुलगा : आता मला घट्ट मिठी मार... मुलीने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आतातरी हळू चालव...... मुलगा तिला बोलला कि आता माझे Helmet काढ आणि ते तू घाल..... मुलीने ते Helmet घातले आणि त्याला मोटारसायकल हळू चालवायला सांगितले... . . . दुसरा दिवशी पेपरात बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण पावला पण ती मुलगी Helmet मुळे काहीहि इजा न होता वाचली.. कारण त्याला माहित होते कि मोटारसायकलचा Break fail झाला होता...! :(

Wednesday, June 6, 2012

तुझ्याविना..............



खुप बोलायचय तुझ्याशी तू परत आल्यावर
पटवून द्यायचय तुला किती उणीव भासली तू गेल्यावर
लवकर ये परत तू , आता कुठेही जाऊ देणार नाही तुला
इतकी आठवण आली तुझी , तू एकदा तरी आठवलेस का मला !

लवकर ये परत तू , तुला डोळे भरून पहायचय
लटके लटके रागावून स्वत:लाच मनवुन घ्यायचय
तुझ्या विरहाचे शल्य क्षण क्षण बोचतय
शिरून मिठीत तुझ्या खुप खुप रडायचय !

हे दुराव्यातिल दिवस मला खुपच खायला उठले
तुझ्याविना मी किती अधूरी , माझं मला कलुन चुकले !